राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आज चंदगड विधानसभा मतदारसंघात
M K Patil 1 Sept. 2024
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय जयंत पाटील आज चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या उपस्थितीत महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात ‘हिरकणी महोत्सव, जागर नारी शक्तीचा‘ या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते चंदगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. निवडणुकांची अद्याप जरी घोषणा झाली नसली तरी प्रत्येक पक्ष आणि उमेदवार जोरात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माननीय जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मा. जयंत पाटील मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. मा. शरद पवारांच्याप्रती त्यांची निष्ठा अनेक आघातानंतरही कायम राहिली. महाराष्ट्राच्या राजकारणाची, निष्ठेची माती झालेली असताना माननीय जयंत पाटील यांच्यासारखा महाराष्ट्राचा मातब्बर नेता शरद पवारांच्या कठीण काळात खंबीरपणे उभा राहतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठेचा एक अध्याय सुरू होतो. यंत्रणांचा वापर करून जयंतरावांना जेरीस आणण्याचा मोठा प्रयत्न झाला मात्र जयंतरावांनी त्याला भीक घालली नाही.पैसा ,सत्ता ,संपत्ती यापेक्षा निष्ठेलाच लोक महत्व देतात याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली आहे. माननीय जयंत पाटील यांच्यासारख्या अनेक निष्ठावान नेत्यामुळेच शरद पवारांचा स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीत ८० टक्के राहिला.
या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत अनेक चर्चा मतदारसंघात होत असताना माननीय जयंत पाटील यांचं चंदगड विधानसभा मतदारसंघात येणं हे विशेष आहे. चंदगडच्या महाविकास आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी आघाडी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असा निर्धार विविध कार्यक्रमात व्यक्त केला आहे. काही दिवसात महाविकास आघाडीतून ही चंदगडची जागा कोणाला जाते हे निश्चित होईल. मात्र या मतदारसंघात उमेदवार कितीही जरी असले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा जनतेमध्ये सुर आहे. मा.जयंत पाटलांच्या आजच्या येण्याला विशेष वलय आहे. गेल्या चार विधानसभेच्या इतिहास पाहता ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राखली आहे. मा.शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.महाविकास आघाडीतून ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल हे मात्र आगामी काळाच ठरवेल.
Nandatai Kupekar-Babhulkar NEWS राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आज चंदगड विधानसभा मतदारसंघात